सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मुकुटबन असून येथे भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले. मुकुटबनसोबत परिसरातील ३० ते ४० गावाचे संपर्क येतो . या केंद्राचा लाभ या गावांना होईल. तालुक्यात ग्रामीण भागामध्ये भारतीय स्टेट बँकेची मुकुटबन येथेच शाखा आहे. त्यामुळे बँक ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते.
कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी व जमा करण्यासाठी तसेच इतर कामांकरिता पासबूकधारक व शेतकऱ्यांना तासनतास बँकेसमोर उभे राहावे लागते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. मुकुटबनला एस. बी. आय.चे ग्राहकसेवा केंद्र सुरू केल्यामुळे गावकऱ्यांसह ग्रामीण जनतेला त्रास होणार नाही.
सदर केंद्रात १० हजार रुपयांपर्यंत काढण्याची २० हजार रुपयांपर्यंत जमा करण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच इलेक्टरीक बिलांचा भरणा, पॅन कार्ड काढणे ही सुविधा मिळेल असे संचालक तुषार अनिल कडुकर यांनी सांगितले. ग्राहकसेवा केंद्राचे उद्घाटन भारतीय स्टेट बँकचे व्यस्थापक नवीन मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष मंगेश गादेवार, गजू कोटगीरवार, प्रेम नरडलवार, केशव नाकले, संदीप कांदस्वार व इतर नागरिक व व्यापारी उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)