नागोराव ढेंगळे यांना राज्यस्तरीय शैक्षणिक दीपस्तंभ पुरस्कार
ढेंगळे जिल्हा परिषद कोरंबी मारेगाव येथील शिक्षक
विवेक तोटेवार, वणी: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मारेगाव (कोरंबी) येथील उपक्रमशील विषय शिक्षक नागोराव ढेंगळे यांना शैक्षणिक दीपस्तंभ राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सदर पुरस्कार हा शिक्षक दिनी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. तर 11 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आला. डॉ. गोविंद नांदेडे माजी संचालक एस.सी.ई.आर.टी.पूणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात आले.
नागोराव ढेंगळे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. अध्यापनात प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोना काळात झूम अँप वरून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग अध्यापन शालेय स्तरावरील उपक्रम उदा. महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी, पालक सभा, आंतरराष्ट्रीय महिला दिन, स्पर्धा परीक्षा इत्यादी. लोकसहभागातून शाळेचा विकास करण्यात मोलाचा वाटा आहे. तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाअंतर्गत राज्य स्तरावर निबंध सादर.राष्ट्रीय आणि सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग आहे.
नागोराव ढेंगळे यांच्या कार्याची दखल घेऊन शैक्षणिक दीपस्तंभ ने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. प्रकाश नागतुरे (ग.शि.अ.), नवनाथ देवतळे (प्र.वि.अ.), अरविंद गांगुलवार उच्च श्रेणी मुख्याध्यापक, राजेन्द्र खोब्रागडे अध्यक्ष (ब.अ.क.म.), राजेन्द्र ठाकरे सरपंच मारेगांव कोरंबी, विजय आवारी मोहनराव कुचनकार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, तसेच विजय शेळके (स.शि.), कु. माधवी पोटकर (प.वि.शि.), कु. प्रिया राऊत (स.शि.), कु. वंदना आस्वले (स.शि.) तसेच सर्व मित्र मंडळी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.
हे देखील वाचा:
प्रेमात पडून हाताशी धरला ‘यार’, नव-याच्या हत्याकांडात बायकोच सूत्रधार
Comments are closed.