प्रशासनाच्या हलगर्जी विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन

संशयीतबाबत माहिती देऊनही कार्यवाही न केल्याचा आरोप

0

विवेक तोटेवार, वणी: वणीत जी सातवी व्यक्ती पॉजिटिव्ह सापडली ती व्यक्ती 4-5 दिवस गावात मुक्त संचार करत होती. प्रशासनाला याबाबत वारंवार माहिती देऊनही प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले असा आरोप करून याप्रकरणी दोषी अधिका-यांवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी वणीतील विविध राजकीय पक्षातील पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत आज सोमवारी दुपारी प्रशासनामार्फत निवेदन देण्यात आले.

वणीत कोरोनाचा पहिला रुग्ण दिनांक 20 जून रोजी निष्पन्न झाला. ज्या घरात कोरोनाचा रुग्ण सापडता त्या घरात ती महिला मालिशच्या कामासाठी जात होती. घरात कोरोनाचे रुग्ण सापडताच मालिश करणा-या व्यक्तीलाही तातडीने कॉरन्टाईन करण्याबाबत नगर पालिका मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांना सूचना देण्यात आली होती. मात्र कोणत्याही अधिका-यांनी याकडे लक्ष दिले नाही. असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

निवेदन देताना विविध पक्षाचे पदाधिकारी

याविषयी काही नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिका-यांना याबाबत माहिती दिल्यावर त्या व्यक्तीला कॉरन्टाईन करण्यात आले. दरम्यानच्या काळात सदर महिला शहरात मुक्त संचार करत होती. ती व्यक्ती पॉजिटिव्ह आली आहे. जर प्रशासनाने आधीच त्या व्यक्तींला कॉरन्टाईन केले असते तर ती इतर लोकांच्या संपर्कात आली नसती. असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष करणा-या अधिका-यांवर कार्यवाही करा अशी मागणी राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी केली आहे.

याबाबत आज उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर दिपक कोकास, रवि बेलूरकर, आबिद हुसेन, राजू तुराणकर, नईम अजीज, रज्जाक पठाण, प्रमोद लोणारे, अमित उपाध्ये, ललीत लांजेवार, मंगल भोंगळे, राहूल खारकर, सुभाष तिवारी, मुकेश खिरटकर यांच्या सही आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.