रासा येथून सुमारे 10 लाखांचा प्रतिबंधीत तंबाखुचा साठा जप्त

तंबाखू किंग दीपक चावला याच्यासह आणखी एकाला अटक

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील रासा गावात एका घरात असलेल्या गोदामावर वणी पोलिसांनी छापा टाकून तब्बल 10 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित मजा या सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. शनिवार 24 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. वणी येथील एक गुटखा तस्करचे रासा गावात गोदाम असून मोठ्या प्रमाणात गुटखा, तंबाखू व सुपारीची साठवणूक असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची खेप येणार असल्याची माहितीवरून पोलिसांनी दुपारी 2 वाजता दरम्यान रेड केली. प्रकरणी वणी येथील आरोपी दिपक कवडु चावला (40) तसेच गोदाम मालक व वाहन चालक रासा येथील दिपक महादेव खाडे (27) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

        

सदर कारवाईत पोलिसांनी 34 पोत्यामध्ये  झेन टॉबेको कंपनीचे मजा 108 हुक्का शिशा तंबाकूचे टिन डब्बा व पाकिटे भरलेली 9 लाख 55 हजार 600 रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू जप्त केले. तसेच माल वाहतूक करणारे टाटा एस वाहन क्र.(MH29 AT 0885) किंमत 5 लाख, अशे एकूण 14,55,600 रुपयांचे मुद्देमाल आरोपिकडून जप्त करण्यात आले. सदर तंबाखू चंद्रपूर येथील वसीम नावाच्या व्यक्ती कडून आणल्याची माहिती आरोपीं कडून मिळाली आहे.

        

विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले आरोपी दीपक चावला यांचे महादेव नगरी येथील घरावर दि.7 जानेवारी 2021 रोजी वणी पोलिसांनी

छापा टाकून बनावट तंबाखू व सुपारी तयार करण्याचा कारखाना पकडला होता. त्या प्रकरणात आरोपीची तब्बल दोन महिन्यानंतर मार्च महिन्यातच जामिनावर सुटका झाली आहे.

             

सुगंधी तंबाखूचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री यावर संपूर्ण राज्यात प्रतिबंध लावण्यात आला आहे. मात्र खर्रा शौकिनांची तलफ भागविण्यासाठी सीमावर्ती तेलंगणा राज्यातून व चंद्रपूर येथून मोठ्या प्रमाणात गुटका व मजा तंबाखू तस्करी केली जाते. वणी येथील काही गब्बर तस्कर दररोज लाखों रुपयांची तंबाकू व गुटख्याची विक्री करतात. गुटखा व तंबाखू व्यापाऱ्यांवर अनेकदा कारवायासुद्दा करण्यात आली. पोलिसांनी आरोपी  दिपक महादेव खाडे  (27), रा.रासा ता. वणी, दिपक कवडु चावला (40), रा.महादेव नगरी वणी व  वसीम रा चंद्रपुर विरुद्द कलम 188, 269,ब270, 271, 272, 273 मा वि सह 2, 3 साथ रोग अधिनियम अनव्ये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरु केले आहे.

          

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप वि.पो.अ. संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव, पो.उप.नि. गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वांडर्ससवार यांनी केली. 

हे देखील वाचा:

अवघ्या 10490 रुपयांमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर

6 जणांच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची वणीला भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!