ग्रामीण डाकसेवकांनी उचलले  बेमुदत संपाचे हत्यार

0

विवेक तोटावार, वणी: संपूर्ण भारतात केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात  ग्रामीण डाक सेवकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्या अनुषंगाने वणी उपडाकघर विभागातील सर्व ग्रामीण डाक सेवकांनी आपली सक्तह दिली आहे. 22 मे  मंगळवार पासून डाक सेवक बेमुदत संपावर आहेत. त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते संपावर असणार आहे.

सविस्तर वृत्त असे की, डाक विभागात अतिरिक्त ग्रामीन डाकसेवक म्हणून नेमण्यात आले .परंतु त्यांना सरकारी सेवेत घेतले असले तरी त्यांना सुविधा मात्र कोणत्याही देण्यात आल्या नाही.  त्यांना स्थायी करण्याबाबत व केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा देण्याबाबत अनेक वेळी निवेदन देण्यात आले. संपही पुकारण्यात आले परंतु प्रत्येक वेळी निराशाच हाती लागली. काहीतरी थातूरमातूर मागण्या मान्य करून संप मिटविण्यात आले. यासंबधी न्यायालयाने डाकसेवकांच्या बाजूने निर्णय दिला आहे. परंतु सरकारच जर न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय घेत नसेल तर दाद कुणाकडे मागावी. असा प्रश्न आहे. यावेळी जर मागण्या मान्य करण्यात आल्या नाही तर संपूर्ण भारतात ग्रामीण डाक सेवक कामावर रुजू होणार नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

डाक सेवेत असणाऱ्यास 7 वा वेतन आयोग लागू झाला आहे. परंतु ग्रामीण डाकसेवकांना अजूनही हा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही. त्यांच्या मागण्यांमध्ये इतर केंद्रीय कर्मचार्यांप्रमाने  सर्व सुविधा देण्यात याव्यात ही महत्वाची मागणी आहे. त्याचप्रमाणे डॉ कामलेचंद्र कमिटीच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात हीदेखील  मागणी आहे. हा प्रश्न आता सरकार केव्हा निकालात काढणार व न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला केव्हा मान्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.