रविवारी शेतकरी मंदिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव

भाजयुमोतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: रविवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी वणीतील शेतकरी मंदिर येथे शहरातील 10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. सीबीएसई बोर्डात 10 वी व 12 वीत 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळणा-या तसेच स्टेट बोर्डात 10 व 12 वीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भाजयुमोच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजयुमोतर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.