लाठी येथील विद्यार्थ्यांना करता येणार वेकोलिच्या स्कूलबसमधून प्रवास

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लाठी येथील विद्यार्थींना आता वेकोलिच्या स्कूल बसमधून शाळेत जाण्यासाठी परवानगी मिळाली आहे. यासाठी विदर्भवादी युवा नेते राहुल खारकर यांनी पाठपुरावा केला होता. लाठी मोठ्या संख्येने सुंदरनगर येथील दयानंद अँग्लो वेदिक (DAV) शाळा व वणीतील खासगी शाळेत शिक्षण घेण्यासाठी जातात. या शाळेसाठी वेकोलिची स्कूलबस सुरू होती. मात्र या बसमधून केवळ वेकोलि कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवास करता येत होता. त्यामुळे लाठी गावातील पालकांना आपल्या पाल्याला खासगी वाहनाने शाळेत पाठवावे लागत होते. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच यात त्यांचे आर्थिक नुकसान देखील व्हायचे. ही बाब राहुल खारकर यांनी क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ यांच्या पर्यंत पोहोचवली. त्यांनी सर्व पालकांना घेऊन त्यांची भेट घेतली व सदर विद्यार्थांना निःशुल्क सेवा देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली. गेल्या 25 वर्षापासून लाठी-भालर वसाहत ही संयुक्त ग्रामपंचायत आहे. माईन्सच्या डंपिंगमुळे या परिसरात एसटी महामंडळाच्या बसेस येणे बंद झाल्या होत्या. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. राहुल खारकर यांनी या बाबत पाठपुरावा केल्यामूळे विद्यार्थ्यांना मोफत स्कूलबस सेवा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

Comments are closed.