टिळक चौक ते दीपक चौपाटी रस्ता बांधकामाला सुरवात

विवेक तोटेवार, वणी: निधी येऊनही टिळक चौक ते दीपक चौपाटी रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात होत नव्हती. युवासेनेने याचा पाठपुरावा केला होता. अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे याबाबत युवासेनेने निवेदन देत याचा पाठपुरावा केला होता. निवेदनाची दखल घेत सुरवातीला खड्डे बुजवण्यात आले व आता नव्याने रस्ता बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे.

वणीतील मुख्य व सर्वात वर्दळीचा मार्ग म्हणेज टिळक चौक ते दीपक चौपाटी. या मार्गावरील सर्वाधिक वाहने चालतात. त्यातच अवजड वाहने याच रस्त्याने चालतात. परंतु मागील एक ते दीड वर्षांपासून या मार्गाची चाळणी झाली आहे. या मार्गावर मागील वर्षांपासून अपघाताची जणू मालिकाच सुरू झाली आहे. या मार्गावर रोजच किरकोळ अपघात होत असतात. प्रशासन मात्र गप्प बसले होते.

या रस्त्यासाठी निधी हा जानेवारी 2023 आला आहे. परंतु काम सुरू झाले नाही. या मार्गावर जेव्हा एखादा मोठा अपघात होईल व कुणा निष्पाप जीवाचा बळी गेल्यावर रस्ता बांधणीचा मुहूर्त निघणार काय? असा आर्त सवाल युवासेनद्वारे निवेदनातून उपस्थित केला?

पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्डा किती खोल आहे याचा अचूक अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे अपघातात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्याद्वारे निवेदनातून करण्यात आली होती. त्यानंतर लवकरच एका महिन्याच्या आत कामाला सुरुवात झाल्याने वणीकरात समाधानकारक वातावरण व युवासेनवर विश्वास वाढला आहे.

Comments are closed.