वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस, उध्दवसेनेला मोठा धक्का
नाराज पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मुंबई गाठत शिंदेसेनेत सामूहिक प्रवेश
बहुगुणी डेस्क, वणी: वणीच्या राजकारणात शुक्रवारी ‘भूकंप’चा चांगला धक्का बसला. काँग्रेस आणि उद्धवसेनेतील नाराज पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा पक्षांतर्गत घुसमटीचा पारा फुटला आणि त्यांनी थेट मुंबई गाठली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. वणी-मारेगाव-झरी पट्ट्यातील या सामूहिक राजकीय स्थलांतराने स्थानिक सत्तासमीकरणांना हादरा बसला असून आगामी जिल्हापरिषद निवडणुकांच्या तोंडावर नवा राजकीय खेळ रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

मुंबई येथील नंदनवन निवास येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते. या सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य, वसंत जिनिंगचे माजी अध्यक्ष तथा झरी तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष खुलसंगे, उद्धवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, मारेगाव तालुका काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष गजानन किन्हेकर, वणीचे माजी नगरसेवक तथा उबाठाचे माजी शहरप्रमुख राजू तुराणकर, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे इत्यादींचा समावेश आहे.
तसेच काँग्रेसचे यवतमाळ येथील माजी नगरसेवक पंकज मुंडे, माजी सरपंच डॉ. मारुती माशेलकर, बाजार समितीचे संचालक शंकर पाचभाई, मारेगावचे माजी सरपंच विलास निखाडे, सोमेश्वर गेडेकर, गोपाल खामनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) यवतमाळ शहराध्यक्ष राजू बनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कांबळे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) यवतमाळ शहराध्यक्ष नितीन निकोट यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, संपर्क प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख राजूदास जाधव, सुरेश चिंचोळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड, गजानन डोमाळे, विशाल किन्हेकर, बाळू चेडे आदी मान्यवर उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे राजकीय समीकरणे नव्याने आकार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Comments are closed.