जब्बार चिनी, वणी: नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत साहील राठोड यशस्वी झाला. डेंटीस्ट डॉ. विजय राठोड यांचा तो मुलगा आहे. साहीलला तब्बल 552 गुण या परीक्षेत मिळालेत. त्याला वडलांची परंपरा जोपासत मुंबईत MBBS करायचे आहे. साहील आपल्या यशाचे श्रेय आईला देतो.
कठोर मेहनत, परीश्रम आणि संघर्ष यामुळे एखादा माणूस जीवनात प्रचंड यश मिळवू शकतो. शून्यातून विश्व उभे करणाऱ्या दिग्गज व्यक्तींची आपण उदाहरणे देत असतो. अगदी सामान्य असलेल्या व्यक्ती आयुष्यात असे काही करून दाखवतात की, त्यांची दखल संपूर्ण जग घेते. माणसाच्या आयुष्यात एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि तो माणूस अमूलाग्र बदलतो.
ध्यास, धडपड, सातत्य, प्रामाणिकपणा, कौशल्य, बुद्धिमत्ता, कठोर मेहनत, जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्ती यांच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरावर विराजमान होतो. सामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा डाॅ विजय राठोड गेल्या 20 वर्षांपासून वणीमधे खासगी दंतवैद्यकिय दवाखाना चालवत आहे. त्यांचे दोन्ही मुले आगदी गुणवान आहेत. मोठा मुलगा रिषभ मुंबईला बि. डी. एस. त्तृतीय वर्षाला शिकत आहे. साहीलच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)