गजानन पडलवार नीट परीक्षेत उत्तीर्ण

अत्यंत संघर्षातून सुरू शैक्षणिक प्रवास

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील गरीब शेतकरी गंगारेड्डी पडलवार यांचा मुलगा गजानन नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याच्यावर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. झरीसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील विद्यार्थी नीटसारख्या परीक्षेत उत्तीर्ण होणे ही तालुक्याकरिता गौरवाची बाब आहे. त्याने अत्यंत संघर्षातून आपला शैक्षणिक प्रवास सुरू केला, हे विशेष.

गजानन याला लहानपणापासून शिकण्याची मोठी इच्छा होती. परंतु गरिबीमुळे शिक्षण मिळेल की नाही असे त्याला वाटत होते. परंतु गजानन यांचे भाऊजी माजी सैनिक राजेश बोल्लीवार रा. मुकुटबन यांनी पुढाकार घेतला. गजानन याला पहिल्या वर्गापासून शिकविण्याचा विडा उचलला.

गजानन याला पहिल्या वर्गापासून शिक्षणाकरिता बाहेरगावी ठेवण्यात आले. गजाननच्या शिकण्याच्या जिद्दीने त्याला त्याच्या यशापर्यंत पोहचविले. गजानन हा कोटा येथे शिक्षण घेत होता. नुकत्याच नीटच्या परीक्षा झाल्या. त्यात गजानन गंगारेड्डी पडलवार 720 पैकी 573 गुण घेऊन उत्तीर्ण झाला.

गजानन याची शिकण्याची जिद्द व भाऊजी राजेश बोल्लीवार यांनी केलेली मदत ज्यामुळे गजानन याने नीट परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला. झरी तालुक्याचे नावलौकिक केले. आपल्या यशाचे श्रेय तो जावई, आई व वडलांना देत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.