सम्राट अशोक नगर येथे फळविक्रेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

आज दुपारी उघडकीस आली घटना

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सम्राट अशोक नगरात राहणाऱ्या एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आज मंगळवारी दिनांक 6 जुलैला दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अविनाश अशोक सातपुते (38) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की वणी शहरातील सम्राट नगर अविनाश अशोक सातपुते हा आपल्या कुटुंबासह राहायचा. त्याचा गांधी चौकात फळविक्रीचा व्यवसाय होता. मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊनमध्ये त्याच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यातच अविनाशला दारू पिण्याची सवय होती. सकाळी अनेकांना तो भेटला होता. मात्र दुपारच्या सुमारास त्याने घराच्या छताला नॉयलॉनच्या दोरीने गळफास लावला. दुपारी 3.30 ते 4 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सर्वांशी मिळून मिसळून राहणारा अविनाश असे टोकाचे पाऊल उचलेल याची त्याच्या मित्रांना तसेच परिचितांना थोडीदेखील कल्पना नव्हती. अविनाशच्या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतकाच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. मात्र त्यातील मचकूर कळू शकला नाही. अविनाशच्या पश्चात पत्नी, सहा वर्षाचा मुलगा व आई वडील असा आप्त परिवार आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.