नांदेपेरा व वडगाव टिप येथे विष प्राषण करून आत्महत्या

कर्जबाजारी झाल्याने एका शेतक-याची आत्महत्या

0

गणेश रांगणकर, नांदेपेरा: आज वणी तालुक्यातील वडगाव टिप येथील शेतकरी मारोती नत्थु झाडे (35) याने कर्जाबाजारी झाल्याने राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. तर बुधवारी नांदेपेरा येथील य शेतमजूर गजानन शंकर देठे (43) काल 5 ऑगस्ट रोजी विष प्राषण करून आत्महत्या केली.

Podar School 2025

मारोती नत्थु झाडे हे वडगाव टिप येथील रहिवाशी होते. ते शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. आज दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान त्यांनी विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे चार एकर शेती होती. त्यांनी स्वतःचे घर महिंद्रा फाइनॅन्सकडे गहाण ठेवले असल्याची तसेच त्यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याचीही माहिती मिळत आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे कुटुंब आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नांदेपेरा येथे शेतमजुराची आत्महत्या
नांदेपेरा येथे गजानन शंकर देठे या शेतमजुराने बुधवारी संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यानन आपल्या राहते घरी मोनोसील नावाचे विषारी औषध प्राषण केले. त्यांना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचासासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. मात्र वाटेतच मंदरजवळ त्यांचा मृत्यू झाला.

गजानन यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. त्याच्या मागे वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असे कुटुंब आहे. गजानन याच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.