चिखलगावात इसमाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथे एक इसमाने विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. पांडुरंग सातपुते (45) असे मृतकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी विषारी औषध घेतले. घरच्यांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मात्र आज गुरुवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुले, पत्नी असा आप्तपरिवार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.