हृदयद्रावक: दांडगाव येथे 13 वर्षांच्या बालकाची आत्महत्या

बालकाच्या आत्महत्येने समाजमन सुन्न

भास्कर राऊत, मारेगाव: अवघे 13 वर्षे वय असलेल्या एका बालकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील दांडगाव येथे घडली. आत्महत्या केलेल्या बालकाचे नाव मानस रामकृष्ण शेंबळकर (14) असे आहे. आज दि. 11 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

Podar School 2025

मारेगाव तालुक्यात वर्धा नदीच्या तिरावर दांडगाव हे छोटेसे गाव आहे. या या गावात मृतक मानस रामकृष्ण शेंबळकर (13) हा राहायचा. त्याची आई लहाणपणीच सोडून गेली त्यामुळे तो आपल्या वडिलांसह व मोठ्या भावासह राहत होता. त्याचे वडील हे मोल मजुरी करतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आज सकाळी मानसने घरात असलेल्या लोखंडी अँगलला दोरी लावून गळफास घेतला. सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मानसने या वयात आत्महत्येचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. मात्र ही घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली आहे.

तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरुच आहेत. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केली जात नाही आहे. अथवा अशा घटना थांबण्यासाठी काही ठोस पावलेही उचलले जात नाही. अशातच आता लहान मुले देखील आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहे. यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करीत आहे.

Comments are closed.