भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील एका इसमाने फवारणीचे कीटकनाशके प्राशन करून आत्महत्या केली. आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शेख शहाबुद्दीन शेख लाल (अंदाजे 44) असे मृतकाचे नाव आहे. कर्ज व नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
शेख शहाबुद्दीन शेख लाल हे शहरातील वार्ड क्रमांक 7 चे रहिवाशी होते. त्यांच्याकडे 3.5 एकर शेती होती. ते शेती करायचे व इतर वेळी शहरातच हंगामी व्यवसाय करायचे. त्यांनी नवीनच घर बांधले होते. तिथे ते त्यांची पत्नी व 2 मुलांसह राहायचे.
दरम्यान आज बुधवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी त्यांनी राहत्या घरात कीटकनाशक प्राशन केले. दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. त्यांच्या कुटु्ंबीयांनी तातडीने त्यांना शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
शाहबुद्दीन यांनी नुकतेच घर बांधले होते. त्यासाठी त्यांनी कर्ज काढले होते. शिवाय सततची नापिकी यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली होती. त्यातच खासगी कर्ज, फायनान्स यांच्या मुळे ते तणावात राहायचे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.