घरचे गेले कामानिमित्त बाहेर, मुलीने केली आत्महत्या

राजूर कॉलरी येथील घटना

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे एका अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. कु. खुशी इंदल केवट (13) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. मृत मुलीचे वडील इंदल रामसजीवन केवट (52) यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार कुटुंबातील सर्व जण मजुरी कामानिमित्त बाहेर गेले असता खुशीने घरातील फाट्याला ओढणी बांधून गळफास घेतले. सायंकाळी 6.30 च्या दरम्यान मुलीची मोठी बहीण घरी आली असता तिला खुशी फाट्याला गळफास घेऊन दिसून आली. घरच्या लोकांनी लगेच तिला खाली उतरवून वणी दवाखान्यात आणले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुलीच्या वडिलांच्या फिर्यादवरून पोलिसांनी कलम 174 सीआरपीसी अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एएसआय कांबळे करीत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.