मारेगाव तालुक्यात कोरोनाने काढले पुन्हा डोके वर

ग्रामीण भागात 8 तर शहरात 2 रुग्ण

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मारेगाव तालुक्यातही कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आरोग्य विभागाच्या अहवाला नुसार तालुक्यात ग्रामीण भागातील 8 तर शहरात 2 असे 10 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात 5 महिला 5 पुरुषाचा समावेश आहे.

मारेगाव शहरात 2 तर पहापळ, म्हैसदोडका, बोटोनी, जळका, पिसगाव, सोनूपोड इत्यादी गावात कोरोनाचे एकूण 8 रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

नागरिकांनी सध्या गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सामाजिक अंतर पाळावे, मास्कचा व सॅनिटायझर वापर करावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी अर्चना देठे यांनी केले आहे.

हे देखील वाचा:

धक्कादायक: घरातील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन शिक्षिकेची आत्महत्या

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.