(हे पण वाचा: शेतकऱ्याने हेतुपुरस्सर मारले दुस-याच्या शेतावर घातक तणनाशक)
वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजूर कॉलरी येथील महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडलीये. या महिलेचं नाव आरती देवी विजय प्रसाद (४५) असून तिनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीये.
आरती देवीच्या पतीचा आठ ते दहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूचा तिच्या मेंदूवर आघात पोहचला असल्याची माहिती समोर येत आहे. मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित नसल्यानं या महिलेने आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post