विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या 

राजूर कॉलरी येथील घटना

0
वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजूर कॉलरी येथील महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडलीये. या महिलेचं नाव आरती देवी विजय प्रसाद (४५) असून तिनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीये.
आरती देवीच्या पतीचा आठ ते दहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूचा तिच्या मेंदूवर आघात पोहचला असल्याची माहिती समोर येत आहे. मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित नसल्यानं या महिलेने आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

(हे पण वाचा: शेतकऱ्याने हेतुपुरस्सर मारले दुस-याच्या शेतावर घातक तणनाशक

Leave A Reply

Your email address will not be published.