रहस्य, थरार, भव्यता ! सुपरस्टार प्रभासचा हॉरर फॅन्टसी ‘राजासाब’ रिलिज
सुजाता थिएटरच्या लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद
बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांसाठी या आठवड्यात हॉरर–फँटसी, थ्रिल आणि मनोरंजनाचा भन्नाट अनुभव घेऊन आला आहे प्रभासचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘राजासाब’! सुजाता थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असून भव्य व्हिज्युअल्स, रहस्यमय कथा, दमदार अभिनय आणि थरारक प्रसंगांमुळे ‘राजासाब’बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. सुजाता थिएटरमध्ये दररोज 4 शो मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. वीकेंडला प्रेक्षकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. थिएटरचे अत्याधुनिक साउंड सिस्टिम, मोठा स्क्रीन, आरामदायी आसन व्यवस्था आणि लक्झरी वातावरणामुळे प्रेक्षकांना ‘राजासाब’ पाहताना थरारक आणि भव्य सिनेमॅटिक अनुभव मिळणार आहे.
सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
‘राजासाब’ हा चित्रपट हॉरर, फँटसी आणि थ्रिलरचा अनोखा संगम आहे. एका जुन्या वाड्याभोवती फिरणारी रहस्यमय कथा, त्यामागील गूढ इतिहास आणि त्यात अडकलेला नायक याभोवती चित्रपटाची गोष्ट फिरते. पहिल्याच सीनपासून रहस्य, भीती आणि कुतूहल निर्माण करणारा ‘राजासाब’ शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रभासचा हटके अवतार, दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि भावनिक अभिनय प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटातील पार्श्वसंगीत, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि सिनेमॅटिक ट्रीटमेंट यामुळे हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा ठरतो. क्लायमॅक्स आणि शेवटचे काही प्रसंग प्रेक्षकांना थक्क करणारे असून ‘राजासाब’ हा चित्रपट हॉरर–फँटसी प्रकारातील एक वेगळा अनुभव देतो, अशी प्रतिक्रिया पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांकडून उमटत आहे. एकूणच, मनोरंजन, थरार आणि रहस्याची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘राजासाब’ हा सिनेमा एक उत्तम पर्वणी ठरणार आहे.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.