मारधाड, ऍक्शनसाठी वणीकरांनो राहा सज्ज… वणीत सूर्यवंशी रिलीज

सुजाता थिएटरमध्ये फुल एसी आणि लक्झरी वातावरणात घ्या सिनेमाचा आनंद

वणी बहुगुणी डेस्क:  दिवाळीच्या सुट्टीत प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते तो सिनेमा सूर्यवंशी आता अखेर शुक्रवारी 5 नोव्हेंबर रोजी वणीतील सुजाता टॉकीजमध्ये रिलिज होतोय. रोहित शेट्टी दिग्दर्शीत या सिनेमात अक्षय कुमार एका एटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच अक्षय हा रोहित शेट्टीसोबत काम करतोय. 

रोहीत शेट्टी यंदाच्या दिवाळीत सूर्यवंशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. सूर्यवंशी सिनेमा भारतातील 4000 पेक्षा अधिक सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अखेर हा सिनेमा रिलिज होतोय. वणीतील लक्झरी व फुल एसी असलेल्या सुजाता थिएटरमध्ये हा चित्रपट आज रिलिज होतोय. रोज 4 खेळ या सिनेमाचे असणार आहे. 

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते (येथे क्लिक करा). व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

Comments are closed.