लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन सिनेमाला झोपवणारा ‘कार्तिकेय 2’ वणीत रिलिज
पौराणिक कथेची पार्श्वभूमी असलेला थ्रिल आणि मिस्ट्रीपूर्ण प्रवास.... IMDB वर या सिनेमाला 8.5 रेटिंग... अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क_ 9022027550
बहुगुणी डेस्क, वणी: लाल सिंग चढ्ढा आणि रक्षाबंधन या मोठ्या स्टार कास्ट असलेल्या व बिग बजेट सिनेमाला झोपवणारा थ्रिल आणि मिस्ट्रीने भरपूर असलेला कार्तिकेय 2 हा सिनेमा वणीत रिलिज होतोय. शुक्रवारी दिनांक 19 ऑगस्ट पासून वणीतील सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी आणि लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. वणीत हिन्दी भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय. एकीकडे लाल सिंग चढ्ढा व रक्षाबंधन या सिनेमाला प्रेक्षक मिळत नसताना कार्तिकेय 2 हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कलेक्शन करत चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे IMDB वर या सिनेमाला 8.5 रेटिंग मिळाले आहे.
पौराणिक व अध्यात्मिक पार्श्वभूमी असलेली या सिनेमाची स्टोरी आहे. भगवान कृष्णाच्या अंतीम सत्याचा शोध या सिनेमात दाखवण्यात आला आहे. हा प्रवास अत्यंत रंजक, मिस्ट्रीपूर्ण आणि थ्रिलिंग आहे. पौराणिक कथेतील अनेक गुढ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा विषय अत्यंत नवीन तसेच मांडणी खूप वेगळ्या पद्धतीने केल्याने हा सिनेमा देशभरातील प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला आहे. या सिनेमात निखिल सिद्धार्ध यांनी प्रमुख भूमिका केली आहे. अनुपम खेर यांची या सिनेमातील भूमिकेचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे.
2014 साली कार्तिकेय हा सिनेमा आला होता. हा सिनेमा त्या वर्षीचा ब्लॉकब्लस्टर सिनेमा ठरला होता. त्या वर्षीचे जवळपास सर्व अवॉर्ड या सिनेमाने जिंकले होते. मोठ्या प्रतिक्षेनंतर याचा दुसरा पार्ट रिलिज होतोय. या सिनेमाचा आणि आधीच्या सिनेमाचा कोणताही संबंध नसून या सिनेमाची संपूर्ण वेगळी आहे. त्यामुळे या आधीचा पार्ट पाहिला नसेल तरी प्रेक्षकांना विशेष फरक पडणार नाही. ( मात्र ज्या प्रेक्षकांना या सिनेमाचा पहिला भाग पाहाण्याची इच्छा आहे. त्यांना कार्तिकेय 1 हा सिनेमा हिंदी भाषेत यूट्यूबवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.)
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…
Comments are closed.