आंबेडकराईट मुव्हमेंट कडून सुमीत रामटेकेचा सत्कार

गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सत्कार

0

बहुगुणी डेस्क, वणी: यूपीएस्सी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल शिरपूर येथील सुमीत सुधाकर रामटेके यांचा गुरुवारी 4 ऑक्टोबरला जाहीर सत्कार करण्यात येत आहे. वणीतील आंबेडकराईट मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Podar School 2025

वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. तर प्रमुख अतिथी वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे असणार आहे. वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्राचार्य डॉ. शंकरराव व-हाटे, माजी नगराध्यक्ष सुरेश रायपुरे, प्राचार्य जयंत साठे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबडे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रतिकुल परिस्थितीमध्ये केवळ परिश्रमाच्या जोरावर सुमीत रामटेके या विद्यार्थ्यांने यूपीएस्सी परीक्षेत बाजी मारली असून सुमीतची सध्या केंद्रीय सशस्त्र पोलीस बळ या विभागात असिस्टंट कमांडन्ट म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे अनेक सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास घटनांना प्रेरणा मिळणार आहे. त्याच्या या कार्याचा गौरव करण्याठी या सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयंत साठे यांनी दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंत साठे, सुरेश रायपुरे, डॉ. विकास कांबळे, निकेश जिलठे, विजय नगराळे, पारस नगराळे, डॉ. स्नेहदीप मेंढे, रामेश्वर लोणारे, सिद्धार्थ लोहकरे, अनिल तामगडे, गणेश रायपुरे, सतिश पडोळे, ऋषी रामपुरे, निशांत रामटेके, मधुकर पेंटर, रमेश झाडे, महेश पाटील, विनोद कोठार, सुशील आडकीने, रामचंद्र पुसाटे, लीना रामटेके, रोशणी लोहकरे, लक्ष्मीबाई रायपुरे, मनिषा लोणारे, विनोद आदे, महेश हे परिश्रम घेत आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्यने हजेरी लावावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.