उधारीचे पैसे न दिल्याने मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

0

वणी (रवि ढुमणे): वणीच्या विठ्ठलवाडी भागातील पाचव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अकरा वर्षीय मुलीला वडिलांनी उधारीचे पैसे दिले नाही म्हणून पेट्रोल पंप मालकाने स्कुल बस मालकाला सोबत घेऊन अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार मुलीच्या आईने पोलिसात दिली आहे. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सध्या शहराबाहेर तसेच शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे जणू पीकच आले आहे. शासकीय शाळेत दाखल करण्याचे सोडून पालक देखाव्याकडे तसेच मातृभाषा सोडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना दाखल करीत आहे. खेळण्या बागळण्याच्या वयात भल्या पहाटे उठून चिमुकल्याना शाळेची तयारी करून देण्यासाठी आई वडील पराकाष्टा करतांना दिसत आहे. शाळा दूरवर असल्याने शाळेत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी लागते आणि ते वाहने खरच बालकांसाठी सुरक्षित आहे की नाही याबाबत सर्वच अनभिज्ञ असतात. मागील काळात वडगाव रोडवरील मँक्रून अकेडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कुलबस ला अपघात होऊन चिमुकल्याना प्राण गमवावे लागल्याची घटना घडली होती आणि दुसरीकडे गणेशपूर येथील प्ले स्कुल मध्ये तर निंदनीय प्रकार घडला होता. असे प्रकार घडत असतांना पालक वर्गामध्ये पाहिजे त्या प्रमाणात जागृती झालीच नसल्याचे दिसून येत आहे.

असाच काहीसा प्रकार डीएव्ही या सुंदरनगर येथील ५ व्या वर्गात शिकत असलेल्या मुलीसोबत घडला. विठ्ठलवाडी भागात राहणारे विनोद वासाडे हे बोअरवेल खोदून देण्याचे काम करतात. मशिनद्वारे शेतात, घरी बोअरवेल तयार करून देणारी त्यांचेकडे वाहने आहेत. त्या वाहनांमध्ये डिझेल ते झाबक यांच्या पेट्रोल पंप वरून भरून घेतात. त्या पंपावर त्यांचे उधारीचे व्यवहार चालतात. पंप मालक चारुल सुशील झाबक याने विनोद वासाडे यांचेकडे दोन लाख रुपयांची उधारी मागितली. त्यावरून दोघात वाद निर्माण झाला होता.

नेहमीप्रमाणे विनोदची पत्नी सुषमा हिने डीएव्ही शाळेत 5वित शिक्षण घेणाऱ्या संस्कृती हिला तयारी करून बसने शाळेत पाठवले . सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास बस चालक दिनकर झाडे याने फोन केला व तुमच्या मुलीला पेट्रोल पम्पवर उतरवायला मालकांनी सांगितले तर तिला कुठे उतरवू, असे म्हटल्यावर सुषमाने त्याला आवारी लेआऊट मधील संस्कृतीची मावशी सोनाली खिरटकर यांचे कडे उतरवायला सांगितले. चालक व वाहनातील खोब्रागडे या महिलेने संस्कृतीला मावशीकडे उतरविले. त्यांनी परत सुषमाला फोन करून मालक चंद्रशेखर नाईक यांनी चारुल सुशील झाबक यांच्या पेट्रोल पम्पवर वासाडेच्या मुलीला उतरविण्यासाठी सांगितले व तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

अशी तक्रार सुषमा विनोद वासाडे हिने पोलिसात दिल्यावरून चारुल सुशील झाबक व चंद्रशेखर नाईक विरुद्ध भा दं वि 363,512 नुसार गुन्हा दाखल केला आहे. चालक व वाहनात असलेल्या महिलेच्या सतर्कतेमुळे संस्कृती च्या अपहरणाचा प्रयत्न फसला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.