क्रिकेट प्लेअरसाठी खुशखबर- सोमवारपासून 2 महिन्याचे प्रशिक्षण शिबिर

सनराईज क्रिकेट अकाडमी, नगरवाला जिनिंग, चंद्रपूर बायपास येथे क्रिकेट शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: परिसरातून उत्तमोत्तम आणि दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने वणीत सनराईज क्रिकेट अकाडमीतर्फे 2 महिन्यांच्या क्रिकेट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे नगरवाला जिनिंग फॅक्टरी चंद्रपूर बायपास वणी येथे होणार आहे. सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 4 ते 7 या कालावधीत हे शिबिर चालणार आहे. क्रिकेट अकादमीत केवळ मोजक्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार असल्याने लवकरात लवकर खेळाडुंनी शिबिरासाठीची नोंदणी करावी, असे आवाहन सनराईज क्रिकेट अकादमी तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी खेळाडुंना किंवा त्यांच्या पालकांना 7276358864 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

काय शिकवले जाणार शिबिरात?
सदर शिबिरात मान्यताप्राप्त व अनुभवी प्रशिक्षक हे उदयोन्मुख खेळाडुंना प्रशिक्षण देणार आहेत. केवळ खेळाकडेच नाही तर खेळाडुंच्या फिटनेसकडेही या शिबिरात लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी क्रिकेटसाठीची खास फिटनेस ट्रेनिंग खेळाडूंना दिली जाणार आहे. प्रत्येक खेळाडुला वैयक्तिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. टर्फ विकेटची प्रॅक्टिस खेळाडूंना दिली जाणार आहे. शिबिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जाणार असून बॅट्समनला स्विंग बॉलची प्रॅक्टीस दिली जाणार आहे. यासह खेळातील कौशल्य वाढण्यासाठी विशेष ड्रिलचे देखील आयोजन शिबिरात केले जाणार आहे.

सनराईज क्रिकेट अकाडमी ही वणी व आपल्या परिसरात उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी ओळखली जाते. अनेक चांगले खेळाडू या अकादमीद्वारा पुढे आले आहेत. विशेष म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत प्रशिक्षण खेळाडुंना दिले जाते.

अधिक माहितीसाठी संपर्क – सनराईज क्रिकेट अकाडमी
नगरवाला जिनिंग फॅक्टरी, चंद्रपूर बायपास रोड, वणी
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क – 7276358864

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.