नत्थूजी खानझोडे यांचे आज 19 एप्रिलला निधन,

उद्या 20 तारखेला राजूर कॉलरीत होतील अंत्यसंस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरीतील वार्ड क्रमांक ३ चे रहिवासी नत्थूजी खानझोडे (76) यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 18 एप्रिलला दुपारी 4.00च्या सुमारास निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांचे ते वडील होते. काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. सेवाग्राम येथील उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले. त्यांच्यावर रविवार दिनांक 20 एप्रिलला सकाळी 11.00 वाजता राजूर कॉलरी येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पश्चात 3 मुलं, सुना, नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे. मनमिळावू आणि मृदूभाषी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.