सुषमाजी भारतीय संस्कृतीचं प्रतीक: आ. बोदकुरवार

वणीत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

0

बहुगुणी डेस्क, वणी : सुषमाजी भारतीय संस्कृतीचं प्रतीक होत्या. त्या सक्षम प्रशासक आणि संवेदनशील नेत्या होत्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश दु:खी आहे. त्यांनी देशवासीयांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सुषमाजींचे कतृर्त्व व वक्तृत्व हे हिमालयासारखे अत्युच्च होते. त्यांच्या कतृर्त्वाने भारतीयत्वाचा ठसा जगावर उमटविण्यात त्या यशस्वी झाल्या. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव सदैव माझ्या मनावर राहील असे भावोद्गार आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले. .

येथील बचत भवन मध्ये आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, राजा पाथ्रडकर उपस्थित होते. या श्रध्दांजली सभेत मराठी विज्ञान परिषदेचे प्रा. महादेव खाडे, कॉंग्रेसचे राजा पाथ्रडकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद निकुरे, गटविकास अधिकारी राजेश गायनार, प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कासावार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह प्रशांत भालेराव, शिक्षण प्रसारक मंडळाचे अनिल जयस्वाल, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिनकरराव पावडे, तालुका अध्यक्ष संजय पिंपळशेंडे यांनी संवेदना व्यक्त केल्या. नगराध्यक्ष बोर्डे म्हणाले की, सुषमाजींच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाचा संघषार्चा इतिहास आहे. यापासूनच प्रेरणा घेऊन आम्ही काम करणार आहोत. या सभेचे संचालन रवींद्र सालपेकर यांनी केले..

Leave A Reply

Your email address will not be published.