ईव्हीएमने मतदारांसोबत विश्वासघात केला – दिलीप भोयर

श्री गुरुदेव सेनेचे 'ईव्हीएम भारत छोडो' आंदोलन

0
विवेक तोटेवार, वणी : शुक्रवारी 9 ऑगस्ट क्रांतिदिनी वणीतील टिळक चौकात गुरुदेव सेनेद्वारे ईव्हीएम भारत छोडो आंदोलन करण्यात आले. भारताच्या निवडणूक आयोगाने ईव्हीएमने मतदान प्रक्रिया घेऊन देशातील मतदारांचा विश्वासघात केला आहे. असा घणाघाती आरोप श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांनी  केला आहे.
या आंदोलनाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष व नगरसेवक पी.के. टोंगे उपस्थित होते.  तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरुदेव सेनेचे मुख्य संघटक मिलिंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते नईम अजीज, लढा शेतकरी हक्काचा संघटनेचे अध्यक्ष रुद्रा पाटील कुचनकर, पुंडलिक मोहितकर, मंगल  तेलंग, आदी उपस्थित होते. ९ ऑगस्ट हा देशात क्रांतीदिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे  औचित्य साधून श्री गुरुदेव सेनेच्या वतीने हे आंदोलन छेडले होते.
मागील आठ दिवसांत राज्यात महापूराने  थैमान घातले आहे. या पुरात ज्यांचा जीव गेला आहे अशा लोकांना व देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले. अशा शाहिदांना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाची सुरवात करण्यात आली. यावेळी दिलीप भोयर पुढे बोलताना म्हणाले की, देशातील एटीएम, बँक खाते, कंम्पुटर, लोपटॉप, मोबाईल, हॅक होत आहे. घरातील  स्मार्ट टीव्ही देखील हॅक होऊ शकते.
ईव्हीएमही साप्टवेअर सिस्टीम असून त्या ईव्हीएममध्ये ज्या पद्धतीचे साप्टवेअर लोड केले जाते त्याच पद्धतीने ईव्हीएम आपलं काम करत असते. यामुळे जनतेत ईव्हीएम संदर्भात विश्वसहर्ता उरलेली नाही. जगातील प्रगत देश अमेरिका , जपान, नेदरलँड, सारख्या देशात ईव्हीएमवर बंदी असून भारतातच या मशीनचा आग्रह का धरला जात आहे. असा प्रश्नदेखील उपस्थित करीत राज्यातील विधानसभा निवडणुका ह्या मतपत्रिकेवर घेण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी, उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार मांडले व ईव्हीएमवर बंदीची मागणी केली. या मागणीचे निवेदन देशाचे राष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयुक्त,राज्य निवडणूक आयुक्त यांचेकडे उपविभागीय अधिकारी शरदकुमार जावडे यांचे मार्फत पाठविण्यात आले. यावेळी विनोद  आदे, अतुल पिदूरकर, भैयाजी खाडे, बाबा लालसरे, अनंत गोवर्धन, मंगेश गोरे, भालचंद्र नैताम, दिनेश रायपुरे, गजानन नागपूरे यांचे सोबत अनेक पुरुष व महिला उपस्थित होते.  यावेळी सदर आंदोलनाला शेतकरी नेते संजय देरकर यांनी भेट देऊन ईव्हीएम हटविण्याची मागणीला दुजोरा दिला.
Leave A Reply

Your email address will not be published.