50 हजारांचा हायमास्ट लाईट दीड लाखांचा

सरपंचावर सदस्यांचा हाय पॉव्हर आरोप

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत गावात लावण्यात येत असलेले हायमाष्ट लाईट स्वतःच्या लाभाकरिता लावण्यात येत असल्याचाआरोप करत  50 हजारांचा लाईट दीड लाखांमध्ये दाखवल्याचा ‘हाय पॉव्हर’ आरोप सदस्यांनी करत याविरोधात तक्रार केली आहे. पाटण गावाची लोकसंख्या ५००० असून ४ वॉर्ड व ११ ग्रामपंचायत सदस्य आहे. गावातील प्रत्येक वॉर्डात इलेक्ट्रिक पोल टाकून लाईट ची व्यवस्था केली असून संपूर्ण गाव लखलखीत केला आहे .गावातील लाईन व्यवस्थेकरिता ग्रामपंचायतने ७ ते ८ लाख रुपये खर्च करून व्यवस्था केली. आज गावात लाईटची गरज नसताना प्रभारी सरपंच प्रवीण नोमुलवार व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमत करून ५० ते ६० हजाराचा हायमाष्ट लाईट दीड लाख रुपये दाखवून स्वतःचा फायदा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.

कृती आराखड्यात तरतूद नसतांना सुद्धा तरतुदीपेक्षा जास्त खर्चास मंजुरी घेऊन चार हायमाईष्ट लाईट लावण्याच्या तयारीत प्रभारी सरपंच लावण्याच्या तयारीत दिसत आहे. गावात हाईमाष्ट लाईट लावून खर्च करण्यापेक्ष गावातील शिक्षण, आरोग्य स्वच्छतेकडे लक्ष देऊन त्यावर खर्च करायचे सोडून लाईट लावण्याच्या मागे फक्त स्वतःच्या लाभाकरिता करीत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य व गावकऱयानी गटविकास अधिकारी यांच्या कडे केली असून सदर एकही लाईट गावात लावू नये अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सदस्य शेखर बोनगीरवार,विनोद पोर्जलवार,अशोक गिज्जेवार,संगीता कतूरवार ग्रामवासी पोशेट्टी द्यावर्तीवार,लक्ष्मण पत्तीवार,राजरेड्डी म्याकलवार,नंदू चिंदमवार,अनिल हनमूलवार,शे अहेमद शे बबन,रामलू भोयर, मोरेश्वर तोटावार,महेश आईटवार, वामन चनावार,प्रकाश पुपुलवार,सतीश आईटवार, अनिल म्यानरवार व गावकरी यांनी ही मागणी केली आहे.

बदनाम करण्याचे षडयंत्र- सरपंच
पाटण ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचा प्रभार घेऊन फक्त १५ दिवस झाले. सदर लाईट बसविण्याचा ठराव मी पदभार घेण्यापूर्वीचा आहे. तत्कालीन सरपंच व सदस्यांनी तसा ठराव मंजूर केला आहे. मी फक्त ते लाईट गावात कुठे लावायचे, ते सदस्याना सांगितले. हायमास्ट लाईट बसविण्यात माझा काहीही संबध नसून, मला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याची प्रतिक्रीया प्रभारी सरपंच प्रवीण नोमुलवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.