जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करुन व्यवसाय करणारे येथील सुविधा कापड केंद्रावर शुक्रवारी पथकाने धाड टाकून दुकानाला सील ठोकले. मात्र मागील दारातून ग्राहकांना आत बोलावून माल विक्री करत असल्याची तक्रारीवरून पालिका पथकाने आज शनिवार 22 मे रोजी सकाळी 9 वाजता पुन्हा सुविधा कापड केंद्र या आस्थापनावर धाड टाकली. मात्र त्यावेळी दुकानात एकही ग्राहक दिसून आले नाही. त्यामुळे पथकाने दुकानाच्या मागील दारालाही सील लावून बंद केले.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारून अनेक बडे व्यावसायिक चोर दरवाज्याने माल विक्री करीत असल्याची ओरड सुरु आहे. त्यातच प्रशासनिक पथकाने केलेल्या कार्यवाहीत दुकानाच्या फक्त समोरील शटरला सील लावण्यात येत आहे. त्यामुळे मागील दारातून पूर्वीप्रमाणे माल विक्री सुरु राहत असल्याची तक्रार अनेकजण करत आहे.
मागील एका आठवड्यात शहरातील अनेक बड्या प्रतिष्ठानवर कारवाई झाली आहे. मात्र आर्थिक हव्यासापोटी दुकानदार नियम धाब्यावर बसवून सकाळी 6 वाजता पासून लपून छपून माल विक्री करीत आहे.
हे देखील वाचा: