झरी येथे ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यशाळा उत्साहात
सुशील ओझा, झरी : आर.डी.ओ. ट्रस्ट फिनीश सोसायटी तर्फे नगरपंचायत येथील समाजमंदिरात स्वच्छता ही सेवा कार्यशाळा झाली. झरी शहरात गेल्या दहा महिन्यांपासून हागणदारीमुक्त परिसर व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे.
या प्रकल्पा अंतर्गत संस्था मोटिवेटर यांच्या माध्यमातून शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवार दिनांक 15 ऑक्टोबरला समाज मंदिरात स्वच्छता ही सेवा कार्यशाला घेण्यात आली.
‘स्वच्छ भारत मिशनच्या निर्देशनुसार कशाप्रकारे शहर हागणदारीमुक्त, ओला कचरा व सुका कचरा व्यवस्थापन व वृक्षारोपणाबाबत माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत गावातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
त्यांना फिनीश सोसायटीचे समन्वयक श्रीकांत राठोड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत नगरसेवक शांता जिवतोडे, मंदा सिडाम, सुमन आत्राम, सारिका किनाके व विठ्ठल काटकर उपस्थित होते. मोटिवेटर प्रियंका परचाके, रवी कोरवते व राहुल प्रधान यांनी परिश्रम घेतले.