स्वाक्षरी अभियानाचा मारेगाव व शिंदोला सर्कलचा दौरा

मोफत विजेसाठी आता पर्यंत सुमारे 30 हजार स्वाक्षरी गोळा

0 237

विवेक तोटेवार, वणी: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा मारेगाव तालुक्यात व शिंदोला सर्कलमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. स्वाक्षरी मोहिमेला दिवसेंदिवस लोकांचा प्रतिसाद वाढत असून आतापर्यंत सुमारे 30 हजार लोकांनी स्वाक्षरी करून या अभियानाला पाठींबा दिला आहे. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात हे स्वाक्षरी अभियान सध्या सुरू आहे. यानिमित्त ठिकठिकाणी दौरे काढून चावडीवर, चौकात, पारावर लोकांची प्रत्यक्ष भेट घेऊन विजेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

मंगळवार व बुधवारी मारेगाव तालुक्यात हे अभियान राबवण्यात आले तर गुरुवारी व शुक्रवारी हे अभियान शिंदोला सर्कलमध्ये राबवण्यात आले. मारेगाव शहरात बस स्टँड चौकात स्टॉल लावून लोकांच्या स्वाक्ष-या घेण्यात आल्या. इथे मारेगाव व परिसरातील खेड्यातील सुमारे 3 हजार लोकांनी स्वाक्षरी केली. तर शिंदोला सर्कलमध्ये बेलोरा, नायगाव, सावंगी, चिंचोली, शिवणी, साखरा, कोलगाव, चिखली, येनाडी, परमडोह, चनाखा, शिंदोला इत्यादी गावांमध्ये दौरा करण्यात आला. यात सुमारे 2 हजार लोकांनी 200 युनिट मोफत विजेसाठी स्वाक्षरी केल्यात.

शेतकरी विद्युत परिषदेतर्फे तर रोज स्वाक्षरी दौरा सुरू आहे. त्याचसोबत कार्यकर्ते स्वतः खेडो पाडी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. आता पर्यंत सुमारे 30 हजार लोकांनी स्वाक्षरी केल्या आहेत. हा आकडा रोज वाढतोय. त्यावरून लोकांना हे सरकार स्थानिक लोकांवर अन्याय करत असल्याचे कळू लागले आहे. मोफत वीज हा स्थानिकांचा हक्क आहे. त्यामुळे लोक देखील आता स्वतःहून स्वाक्षरी फॉर्म भरून कार्यालयात आणून देत आहेत. – संजय देरकर

या स्वाक्षरी दौ-यात जीतू नगराळे, गजु येरगुळे, शेख ईफते खान, ईकबाल सय्यद, आकाश भेले, राहुल ढवळे, संतोष कुचनकर, भगवान मोहिते, गणेश संकुरवार, ईकरे काकाजी, अजय भुसारी, लोकेश बोबडे, राजू यादव, भानुदास काकडे सरपंच चनाख, विठ्ठल बोडे सरपंच शिदोला, देवा पाचभाई, नंदु चटप सरपंच चिखली, जयद्रा निखाडे सरपंच चिंचोली, निलेश पिंपळकर, प्रितम बोबडे, विकास पिंपळकर, सुरेश गोहकर, सुरेंद्र पोटे, अरविंद पचभाई, दिवाकर भोंगळे, महेंद्र राखुंडे यांच्यासह संजय देरकर यांचे समर्थक उपस्थित होते.

Comments
Loading...