कीटकनाशक फवारणी बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

शेतकऱ्यांना कृषिविभागाकडून मार्गदर्शन

0 162

जयप्रकाश वनकर, बोटोणी: मारेगावला तालुक्यातील पेंढरी येथे उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड आणि तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांच्या मार्गदर्शनाखाली कीटकनाशक फवारणी विषयक जागृती याबाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते. जनजागृती कार्यक्रमात शेतकरी आणि शेतमजुरांना कृषी अधिकार्यांनी मार्गदर्शन केले. कीटकनाशक फवारणी संबधी घ्यावयाची काळजी व संरक्षीत कीटचा वापर कसा करावा यावर शेतकरी शेतमजुरांना मार्गदर्शन करण्यात आले.

सभेत मासस्टँप लष्करी अळी, ज्वारीवरील अळीबाबत जागृती करून ट्रॅप लावण्याचे प्रात्यक्षित करून दाखवण्यात आले.. कीटकनाशक परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत. मुदतबाह्य झालेली कीटकनाशके खरेदी करू नये. बिगर नोंदणिकृत कीटकनाशक तसेच त्यांच्या पॅकिंगवर केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती यांनी मंजूर केलेला सीआयआर क्रमांक व लाल, पिवळा, निळा किंवा हिरवा त्रिकोण नसल्यास त्यांची खरेदी करू नये. याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी पेंढरी येथील ३२ शेतकरी व शेत मजूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कृषिसेवक विनायक जुमनाके यांनी केले.

Comments
Loading...