स्वामिनीच्या पहिल्या शाखा फलकाचे पाटण येथे अनावरण
जिल्हा दारूबंदीसाठी स्वामिनीचा लढा तीव्र
सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी लढा देणारी स्वामिनी संघटनेने आता वणी विधानसभा क्षेत्रात आंदोलनाला धार देण्याचा प्रयत्न केला आहे. झरी तालुक्यात स्वामिनीद्वारा समिती स्थापन करण्यात आली आहे. यात वणी विधानसभा क्षेत्रातील पहिले फलक हे पाटण येथे लावण्यात आले.
झरी तालुका आदिवासी बहुल असून येथे व्यसनाचे प्रमाण अधिक आहे. दारूला हद्दपार करण्यासाठी पाटण येथील देशी दारू दुकान बंद व्हावे यासाठी स्वामिनीने आडवी बाटलीसाठी मतदान घेवून लढा उभारला होता. मात्र सरकारच्या जाचक अटी मुळे महिलांना हार मानावी लागली. परंतु ही लढाई थांबु नये यासाठी पाटण येथे स्वामिनीची तालुका समिती स्थापन करण्यात आली. आता पाटणच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्हाच दारू बंदी करा ही पाटणच्या स्वामिनीची मागणी आहे.
या फलकाचे उद्धघाटन स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी केले. या प्रसंगी राम आईटवार, जिल्ह्य संघटक, धीरज भोयार विभागीय संघटक, महेश मुके तालुका संयोजक, रमेश हलालवार सरपंच पाटण उपस्थित होते. यानंतर छोटेखानी सभा घेण्यात आली. यावेळी महेश पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना म्हणाले की ही वेळ योग्य आहे. पुढील काही दिवसातच निवडणुका आहे. त्यामुळे आंदोलनाला धार देवून आपली मागणी आपुन रेटुन धरली पाहिजे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि संघटन बांधनीवर भर द्यावा.
कार्यकारीणीमध्ये तालुका समितीच्या संयोजकपदी महेश मुके, अमोल संगमवार, राजू भूतमवार, गजानन ध्यावर्तीवार, मंथना लोढे, प्रतिभा लेनगुरे, झिबल भोयार, वनमाला मारशेट्टीवार, वर्षा कर्मलकर, सुनीता गेडाम, हनमंतु पडलवार, निर्मला दातारकर, राहुल वाघाडे, शेख रहीम, गोविंद येन्नावार, शेख़ हसन, शेख अजगर, महेश ठावरी इत्यादींचा समावेश आहे. यावेळी मोठ्या संख्येने स्वामिनीचे कार्यकर्ते उपस्थित होते.