लॉयन्स स्कूलची स्वरा करंडे पुन्हा विदर्भ संघात

विशाखापट्टणम येथे विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची नववीत शिकणारी स्वरा करंडे हिची सलग दुसऱ्यांदा विदर्भ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. बी.सी.सी.आय. तर्फे आयोजित 15 वर्षाखालील ‘महिला एलीट ग्रुप बी’ लीग स्पर्धा 2 ते 10 जानेवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे पार पडणार असून, स्वरा विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

स्वरा करंडे हिचा क्रिकेट प्रवास बालपणापासूनच सुरू झाला. वडील मंगेश करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लब व शाळेत घेतलेले नियमित, शिस्तबद्ध प्रशिक्षण तिच्या खेळाला आकार देत गेले. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शन सत्रे व प्रशिक्षण शिबिरांमुळे तिच्या खेळात सातत्याने प्रगती होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शाळेचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला तसेच पदाधिकारी सुधीर दामले, चंद्रकांत जोबनपुत्रा, शमिम अहेमद, नरेंद्र बरडीया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे, शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वरा चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

विशाखापट्टणम येथे होणाऱ्या स्पर्धेत तिच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. स्वरा भविष्यात राष्ट्रीय स्तरावर विदर्भ व लायन्स स्कूलचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

 

Comments are closed.