पक्षात डावलल्याचा आरोप करत चक्क नवीन पक्षाची स्थापना

मारेगावातील सेनेच्या ज्येष्ठ नेत्याचे आगळेवेगळे पाऊल

0

नागेश रायपुरे, मारेगाव: पक्षाने वेळोवेळी डावलल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख व ज्येष्ठ नेते यांनी चक्क स्वत:ची राजकीय संघटना स्थापना केली. आज मंगळवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी स्थानिक विश्राम गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत गजानन किन्हेकर यांनी ही माहिती दिली. नवीन राजकीय संघटनेचे नाव “स्वराज्य शेतकरी युवा संघटना” असून यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यानी यात प्रवेश केला. विशेष म्हणजे पुढील निवडणुका ही संघटना स्वबळावर लढविणार असल्याचे संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले.

Podar School 2025

अनेक वर्षांपासून प्रत्येक गावात शिवसैनिक तयार करून पक्षसंघटना वाढवली. ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायतमध्ये सेनेचा भगवा फडकवला. मात्र याच पक्ष वाढवणा-या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने वेगळी स्थानिक राजकीय संघटना उघडत असल्याचे नवीन स्थापन झालेल्या स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तथा सामान्य जनतेच्या हितासाठी स्वराज्य शेतकरी युवा संघटना काम करेल. तालुक्यातील शिवसेनेच्या शिलेदारांना सोबत घेवून नवीन पक्षाची मोट बांधेल. तसेच कुठल्याही पक्षात न जाता स्वबळावर निवडणुका लढवू अशी माहिती देखील पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी सचिन पचारे, विजय मेश्राम, राजु मांदाडे, अमोल गुरनुले, विशाल किन्हेकार, अमोल मत्ते, राजु खडसे, गोपाल खामनकर, अनिल राऊत, तुकाराम वासाडे, अरविंद परचाके, सोमेश्वर गेडेकर, विकास राऊत, सतिश मस्की, भास्कर वेले, राजु गौरकर यांचेसह तालुक्यातील शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.