आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण

तालुक्यात केवळ 28 ऍक्टिव्ह कोरोना पॉजिटिव्ह

0

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी तालुक्यातून 2 पॉजिटिव्ह निघालेत. यात एक रुग्ण कायर येथील तर दुसरा रुग्ण गणेशपूर येथील आहे. हे दोन्ही रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्ट नुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 682 झाली आहे.

आज यवतमाळहून एकही रिपोर्ट प्राप्त झालेला नाही. तर 21 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 2 रुग्ण पॉजिटिव्ह आलेत. तर 19 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 15 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले. अद्याप 73 स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

तालुक्यात 28 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 682 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 654 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 28 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 20 झाली आहे.

आज दोन कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली. सध्या 7 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 18 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 5 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 7 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.