विवेक तोटेवार, वणी: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी मार्डी सर्कलचा दौरा करण्यात आला. अभियानात आतापर्यंत सुमारे 35 हजार लोकांनी स्वाक्षरी करून या अभियानाला पाठींबा दिला आहे. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात हे स्वाक्षरी अभियान सध्या सुरू आहे. यानिमित्त ठिकठिकाणी दौरे काढून चावडीवर, चौकात, पारावर लोकांची प्रत्यक्ष भेट घेऊन विजेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
सोमवारी मार्डी सर्कलमध्ये हे अभियान राबवण्यात आले. यावेळी गावातील चौकात स्टॉल लावून लोकांना या अभियानाची माहिती देऊन लोकांच्या स्वाक्ष-या घेण्यात आल्या. सोमवारी मार्डी सर्कलमधल्या सुमारे 3 हजार लोकांनी स्वाक्षरी केली. यात मार्डी, देवाळा, खैरगाव, हिवरा (मजरा) वनोजा देवी, गोरज, आपटी, दांडगाव, शिवणी (ढोबे) कानिंदा, डोंगरगाव, मच्छिंद्रा, बामुर्डा, चोपण. चनोळा, पार्डी, केगाव, गाडेगाव, मजरा, दारोपा, किन्हाळा, वडगाव, बोदाड, मुक्ता, आकापूर इत्यादी गावांमध्ये दौरा करण्यात आला. हे अभियान 31ऑगस्ट पर्यंत चालणार असून या द्वारे 1 लाख स्वाक्ष-या गोळा करण्याचे ध्येय आहे. या स्वाक्ष-यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केले जाणार आहे.
35 हजार स्वाक्षरी गोळा – संजय देरकर
शेतकरी विद्युत परिषदेतर्फे तर रोज स्वाक्षरी दौरा सुरू आहे. त्याचसोबत कार्यकर्ते स्वतः खेडो पाडी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. आता पर्यंत सुमारे 35 हजार लोकांनी स्वाक्षरी केल्या आहेत. हा आकडा रोज वाढतोय. त्यावरून लोकांना हे सरकार स्थानिक लोकांवर अन्याय करत असल्याचे कळू लागले आहे. मोफत वीज हा स्थानिकांचा हक्क आहे. त्यामुळे लोक देखील आता स्वतःहून स्वाक्षरी फॉर्म भरून कार्यालयात आणून देत आहेत. – संजय देरकर
या स्वाक्षरी दौ-यात प्रा. संजय लव्हाळे, जितू नगराळे, राजकुमार बोबडे, प्रफुल्ल झाडे (उपसरपंच मार्डी) प्रवीण खिरटकर, संदीप आसकर, अरुणभाऊ आस्कर, लटारी करमनकर, मुरलीधर निखाडे, विनोद लोंढे, चेतन खवसे, दिलिप चौधरी, रवि काकडे, शेख इस्माईल, राजू चामाटे, श्रावण बोबडे, विठ्ठल पचारे, प्रफुल्ल बोढे यांच्यासह संजय देरकर यांचे समर्थक उपस्थित होते.