शास्त्रीनगरातील ताबिशचा घात की अपघात ?

पाटाळ्याच्या पुलावरून गाडी पडल्याचं प्रकरण

0

वणी: शहरातील शास्त्री नगर भागात राहणाऱ्या ताबिशचा (28) गुरुवारी पाटाळ्याच्या पुलावरून नदीत कार पडून मृत्यू झाला होता. ताबिश हा भिसीचा व्यवसाय करायचा. आता हा अपघात आहे की घात यावरून शहरात चर्चेला उधाण आलंय. सध्या या प्रकरणी वणी पोलीस कसून तपास करत असून मिळालेल्या माहितीनुसार श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आलंय.

वणी नागपूर मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावरून कार पाण्यात पडल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली होती. कार कोणाची ? चालक कोण ? कार मधील लोक कुठे आहेत असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. वणी ठाणेदार मुकुंद कुळकर्णी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. नदीत पडलेली कार पोलिसांनी इतर यंत्रणेच्या मदतीने बाहेर काढली.

सदर कार ही शास्त्री नगर भागात भिसीचा व्यवसाय करणाऱ्या अनवरुद्दीन ताबिश अफजलुद्दीन शेख या तरुणाची असल्याचे निष्पन्न झाले. कार क्रमांक एम एच २९ ए आर ५४८२ ही कार ताबिश भिसीच्या वसुलीसाठी घेऊन गेला होता. मात्र तो कुठे गेला ?कोणाला भेटला ? त्यानं कोणाशी संवाद साधला असे अनेक प्रश्न अनुत्तरित होते.

पोलिसांनी कार पडलेल्या ठिकाणापासून शोध मोहीम राबविली मात्र कोणाचा थांगपत्ता लागला नाही. गाडीत कोण होते याचा सुद्धा शोध लागला नाही. ठाणेदार कुळकर्णी या घटनेचा शोध घेत आहेत. कोणताही ठावठिकाणा सद्यस्थितीत लागत नसल्याने अखेर पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केल्याची माहिती आहे. आता श्वान पथक कसा शोध घेणार हे लवकरच कळणार आहे.


पाटाळा पुलावरून पाणी नव्हते. नदीच्या पात्रात अत्यंत कमी पाणी होते. मग वाहनातील कार पुलावरून पडली तर कार मध्ये बसणारे गेले कुठे अशा अनेक प्रकारच्या शंका कुशंका उपस्थित होत आहेत. या सर्व घटनाक्रमाचा पोलीस शोध घेत आहेत.

ताबिश भिसीचा व्यवसाय करीत होता. मग आर्थिक देवाणघेवाणीचा काही संबंध तर नाही ना ? जर तसे असेल तर कोणाशी व्यवहार झालेत कोणाशी वाद झाला अश्या अनेक गोष्टी पुढे येणार आहे. तूर्तास या घटनेचा तपास पोलीस पूर्ण ताकदीने करीत असल्याचे दिसत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.