तडीपार गुन्हेगाराला पुरड (नेरड) येथून अटक

● वेळाबाई येथून अवैध दारु विकणाराही ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्हा तडीपारीची शिक्षा असताना घरात लपून बसलेल्या एका सराईत गुन्हेगाराला शिरपूर पोलिसांनी अटक केली. कवडू नामदेव टिकले (50) असे आरोपीचे नाव असून तो पुरड (नेरड) येथील रहिवाशी आहे. शिरपूर पोलिसांनी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी पुरड येथील राहत्या घरातुन कवडू यास अटक केली.

पुरड येथील सराईत दारु विक्रेता कवडू टिकले याला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 57 (अ) (2) प्रमाणे 6 महिन्याकरिता वणी तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले. याबाबत उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेशाची दि. 22 ऑक्टो. रोजी अंमलबजावणी करण्यात आली. मात्र तडीपारीची शिक्षा असताना आरोपी घरी लपून असल्याची गोपनीय माहिती शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड याना मिळाली होती. त्या आधारे आरोपी कवडू नामदेव टिकले यास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

वेळाबाई येथील अवैध दारू विक्रेता गजाआड
शिरपूर पोलीस ठाणे अंतर्गत वेळाबाई गावात अवैधरित्या दारूची विक्री करणारे आरोपी प्रफुल्ल झाडे यास पोलिसांनी सोमवार 22 नोव्हे. रोजी अटक केली. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करून मंगळवार 23 नोव्हे. रोजी न्यायालयात हजर करण्यात आले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन करेवाड, स.फौ. नीलकंठ आडे, हेडकॉन्स्टेबल प्रवीण गायकवाड, प्रमोद जूनुनकर, गंगाधर घोडाम, अनिल सुरपाम, अभिजित कोषटवार, गजानन सावसाकडे यांनी केली.

प्रतिबंधक कारवाईला सुरूवात: ठाणेदार
दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिले आहे. आदेशाच्या अनुषंगाने शिरपूर पोलीस अभिलेखावर दोन पेक्षा जास्त गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगाराविरुद्द प्रतिबंधक कारवाई करीत आहे.
– गजानन करेवाड, सहा.पोलीस निरीक्षक, पो.स्टे. शिरपूर

हे देखील वाचा:

उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे

सरपंच जे करू शकते ते पंतप्रधान नाही: भास्कर पेरे पाटील

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.