वृक्ष तोडणाऱ्यांवर 15 दिवसात कारवाई करा

पावसाळ्याच्या आधी झाडे न लावल्यास युवासेना स्टाईल आंदोलनाचा इशारा

विवेक तोटेवार, वणी: शहरात वृक्ष संवर्धन समितीद्वारे 2010 रोजी जवळपास 650 झाडे लावली होती. त्यांचे संगोपन करण्यात आले व त्यांना पाणी देऊन मोठे करण्यात आले. परंतु रस्त्याच्या कामाच्या वेळी सर्व झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र हे झाडे तोडल्यानंतर पुन्हा नव्याने झाडे लावण्यात आली नाही. या संदर्भात मंगळावारी दिनांक 11 जून रोजी सा. बां. विभागात निवेदन देण्यास गेले. मात्र तिथे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी खुर्चीला हार घालून आपला निषेध व्यक्त केला. त्यानंतर युवासेना द्वारे थेट जिल्हाधिकारी यांना उपविभागीय पोलीस अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.

वणीत चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. या रस्त्याच्या कामात शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. यातील जवळपास 650 झाडे वृक्ष संवर्धन समिती द्वारे लावण्यात आली होती. या वर्षांच्या कालखंडात ही झाडे मोठी झाली होती. परंतु 2022 साली चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग पासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यत सिमेंट रस्त्याचे काम मंजूर झाले. काम सुरू झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेले सगळे वृक्ष तोडण्यात आले.

नियमानुसार तोडलेले झाडांऐवजी झाडे लावणे गरजेचे होते. मात्र ती लावली गेली नाही. सध्या रस्त्याने चालणाऱ्यांना झाडांची सावली शोधावी लागत आहे. आता समोर पावसाळा आहे या पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात यावी. सोबतच ही झाडे तोडणाऱ्या अभियंता व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

खुर्चीला हार टाकून नोंदवला निषेध

तसचे या प्रकरणी ठेकेदार व अभियंता यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी युवासेने द्वारा करण्यात आली आहे. जर 15 दिवसांच्या आता या प्रकरणी योग्य ती कार्यवाही झाली नाही तर युवासेना आपल्या स्टाईलने आंदोलन करणार, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.