टारगेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सचं अतुलनीय कार्यं

मारेगावच्या तहसीलदारांनी केला जवानांचा सत्कार

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टारगेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सचं (TDRF)च्या जवानांनी जनतेची निस्वार्थ सेवा केली. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दीपक पुंडे यांच्या हस्ते तहसील कार्यालयात जवानांचा “कोविड योद्धा”म्हणून सन्मान करण्यात आला.

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये राज्यातील तथा राज्याबाहेरील शेकडो लोक तालुक्यात अडकलेले होते.अशातच शहरी व ग्रामीण भागातील निराधार, निराश्रित, दिव्यांग व मनोरुग्ण आदी नागरिकाना TDRFच्या वतीने तालुक्यातील जवानांनी दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करून दिली.

बाहेरील मजुरांना गावाला जाण्याची व्यवस्था लावून दिली. एवढेच नव्हे तर गावागावांमध्ये जाऊन कोरोनाविषाणू संबंधित जनजागृती केली. जे लोक मास्क घेऊन शकत नव्हते, अशा सर्वांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

सोबतच ग्रामीण व शहरी भागात असलेल्या गरजूंना जीवनावश्यक वस्तू व किराणा धान्य किटचे वाटप करण्यात आले. तसेच संचारबंदी मध्ये सतत कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना चहा-नाश्ता देऊन मदत केली. असे सर्व सेवाकार्य TDRF संचालक हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड यांच्या मार्गदर्शनात जवानांनी केले.

त्यांच्या या सेवाकार्याची दखल घेत प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दिपक पुंडे यांच्या हस्ते TDRF जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस, क्षेत्रीय अधिकारी समन्वयक मुस्कान सय्यद, क्षेत्रीय अधिकारी काजल वाळके, कंपनी कमांडर निकेश पुनवटकर, कंपनी कमांडर दर्शनाचे चेके, सहा.कंपनी कमांडर गुलसागर ठाकरे,

सहा. सहा.कंपनी कमांडर अश्विनी पराचे, कंपनी कमांडर किरण चव्हाण, कंपनी ड्रिल इंस्ट्रक्टर
मारोती तलांडे, कंपनी ड्रिल इंस्ट्रक्टर लक्ष्मी जाधव, कंपनी ड्रिल इंस्ट्रक्टर सुजाता चौधरी, कंपनी ड्रिल इंस्ट्रक्टर वैभव गोवर्धन,कंपनी ड्रिल इंस्ट्रक्टर निकिता पिंपळकर, कंपनी सेक्शन कमांडर ज्योती सलाम,

कंपनी सेक्शन कमांडर आकाश पुनवटकर, कंपनी सेक्शन कमांडर तनवी मुडे, कंपनी सेक्शन कमांडर अंजली मेश्राम, कंपनी सेक्शन कमांडर विनय सुरतेकर, कंपनी सेक्शन कमांडर कोमल गोवर्धन, सर कंपनी सेक्शन कमांडर विज्ञा खुटेमाटे,

कंपनी सेक्शन कमांडर निशिगंधा बनसोड, कंपनी सेक्शन कमांडर प्रतीक्षा अंबाडेरे व इतर सर्व टी डी आर एफ अधिकारी व जवानांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तहसीलचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.