जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येखील एका शिक्षिकेने घरातील पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली. घटना बुधवार 3 मार्च रोजी घडली. वैशाली दशरथ विधाते (42) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. मागील 12 वर्षांपासून त्यांना पोटदुखीचा त्रास होता. सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलेले जात आहे.
मुकूटबन ता. झरीजामनी येथील वैशाली विधाते जि. प. प्रा. शाळा अडेगाव येथे शिक्षिका होत्या. बुधवार 3 मार्च रोजी दुपारी 4 वाजता पासून वैशाली घरी दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेणे सुरु केले. मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. दरम्यान घरातील एक मुलाने छतावर जाऊन बघितले असता सिंटेक्सची पाण्याची टाकीजवल वैशालीं यांच्या चपला पडून होत्या.
त्यांनी ही बाब खाली येऊन सांगितली. घरच्या लोकांनी तात्काळ जाऊन सिंटेक्सच्या टाकीत पाहिले असता वैशाली पाण्यात पडून असल्याचे दिसून आले. वैशाली यांना तात्काळ वणी येथील सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मृतक वैशालीला दोन मुली असून मोठी मुलगी स्नेहल नीट परीक्षेच्या तयारीसाठी कोटा (राजस्थान) येथे जाऊन आहे. तर दुसरी मुलगी सृष्टी ही आठव्या वर्गात आहे. वैशालीचे पती दशरथ झित्रुजी विधाते शिक्षक आहे. वैशालीच्या अकस्मात मृत्यूनंतर तिच्या मुलीला कोटा येथून आणण्यासाठी कार पाठविण्यात आली आहे. तर वैशालीची मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयाच्या मोरचरीमध्ये ठेवण्यात आले आहे. उद्या शुक्रवारी तिच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे.
मागील 12 वर्षांपासून वैशालीला पोटदुखीचा त्रास होता. एलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी व इतर विविध उपचार करूनही त्यांना पोटदुखीचा त्रास सुरूच होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. अत्यंत सरळ व मृदु स्वभावाच्या वैशाली विधाते यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण तालुक्यात तसेच शिक्षक वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्या शुक्रवारी त्यांच्यावर मुकुटबन येथील मोक्षधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा: