तालुका प्रतिनिधी, वणी: येथील आदर्श विद्यालयाचे शिक्षक प्रवीण लटारी पावडे (52) यांचे दि. 14 सोमवारी सकाळी यवतमाळ येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज यवतमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शहरातील मंगलम पार्क येथे ते त्यांच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. गेल्या 8 दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. मात्र काल दि. 13 रविवारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.
मात्र डॉक्टरांनी त्यांना परसोडा येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना यवतमाळ येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतक प्रवीण पावडे यांचा मूळ गाव चिलई (तेजापूर) होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आप्त परिवार आहे.
(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)