सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिक्षकांनी कोविडच्या रुग्णाकरिता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देऊन माणुसकी जपली आहे. मुकुटबन झरी व शिबला येथे शासकीय रुग्णालय असुन कोविड 19 च्या रुग्णाकरिता ऑक्सिजनची व्यवस्था नाही. त्यामुके रुग्णांना वणी पांढरकवडा व यवतमाळ सारख्या ठिकाणी रेफर करावे लागते. परंतु झरी येथील रुग्णांना काही प्रमाणात ही अडचण दूर होण्याची चिन्ह दिसायला लागली आहे. पंचायत समिती झरी कोविड मदतनिधी सहकार्यातून झारी येथील प्रथमिक आरोग्य केंद्राला 2 लाख रुपये किमतीचे 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले आहे.
सदर ऑक्सिजन यंत्र दर मिनिटाला रुग्णाच्या आवश्यकते नुसार 1 ते 7 लिटर प्राणवायू निर्माण करते. तसेच 24 तास कार्य करण्याची क्षमता या यंत्र मध्ये असल्याने हे अत्यावश्यक रुग्णांना याचा उपयोग होऊ शकतो. तालुक्यातील शिक्षकांनी कोविड 19 च्या रुग्णाकरिता प्रत्येकी 1 हजार ते 2 हजार रुपये वर्गणी करून आरोग्य केंद्राला भेट दिली.
त्यांच्या या कार्याची प्रशंसा तालुक्यातून होत आहे. सोहळ्याप्रसंगी तहसीलदार गिरीश जोशी, गटविकास अधिकारी रेज्जीवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम व गट शिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे उपस्थित होते.
तालुका आदिवासी बहुल तालुका आहे. तालुक्यात अनेक विविध समस्या असून याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे. कोविड 19 चे रुग्ण तालुक्यात 335 च्या वर असून डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था असलेले बेड नाही यासह इतर अनेक समस्या निर्माण झाल्या आहे.
हे देखील वाचा:
लॉकडाऊमध्ये मागल्या दारातून कपडे खरेदीची ‘सुविधा’ देणा-या दुकानावर धाड