विलास ताजने वणी : वणी येथील आदर्श हायस्कूलमध्ये शिक्षक दिनाचे औचित साधून स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, सेवक आदी भूमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या. मुख्याध्यापक म्हणून ऋतुजा गाताडे, पर्यवेक्षक ममता मोरे आणि सतरा विद्यार्थी शिक्षकानी अध्ययन, अध्यापनाचे धडे गिरवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. एन. झाडे, प्रमूख अतिथी म्हणून लता पाटणकर उपस्थित होत्या. तृप्ती माळीकर, साक्षी बिनगुले, नेहा पठाण, आचल काकडे, राखी जुनगरी, गुरुदेव सिंग या विद्यार्थी वक्त्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी लाकडे, प्रास्ताविक कीर्ती पिंपलशेंडे यांनी केले. आभार भारती वालदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी माणिक सोयाम, शंकर राठोड, वैजनाथ खडसे, विजय वासेकर, प्रवीण पावडे, रुपलाल राठोड, यशवंत भोयर, संध्या लोणारे, पूनम सिंग, रवी उलमाले, बाबाराव कुचनकर, रमेश दुमणे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.