‘अविनाश’ या शॉर्टफिल्मचे टिझर युट्युबवर रिलिज

स्थानिक कलावंतांची शॉर्टफिल्म 28 जानेवारीला होणार रिलिज

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील अक्षय रामटेके याच्या पुढील ‘अविनाश’ या शॉर्टफिल्मचे टिझर युट्युबवर रिलिज झाले आहे. स्थानिक कलावंतींनी यात अभिनयासह सर्व तांत्रिक जबाबदारी सांभाळली आहे. 28 जानेवारीला सदर शॉर्टफिल्म यूट्यूबवर रिलिज करण्यात येणार आहे. एका शेतकरी पित्याचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या शॉर्टफिल्मची कथा व वेशभूषा गणेश मत्ते यांची आहे. तर सिनेमॅटोग्राफी अतुल खोब्रागडे, अक्षय रामटेके यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

अविनाश शिवनीतवार, पल्लवी भटारकर, गणेश मत्ते, आशा हर्षद गहुकर, आस्था दहेकर, प्रिया भगत , मंगेश गोहोकार, आकाश महादूले, शंकर गुगरे, गौरव गुले, संदेश दर्वे, संकेत बोडाले, चेतन वानधरे, निखिल उरकुडे यांनी यात भूमिका केली आहे. अक्षयची रेडिओ 1947, स्माईल, गुरुजी, शिव विचारधारा इ. शॉर्टफिल्म युट्युबवर प्रदर्शित झाल्या आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा टीझर

Comments are closed.