गावक-यांनी पंचायत समितीच्या आवारात भरविली शाळा

स्थाई शिक्षक नसल्याने तेजापूरवासी संतप्त

0

विवेक तोटेवार, वणी: तेजापूर येथील शाळेच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी 11 जानेवारीला वणीच्या पंचायत समितीमध्येच शाळा भरवली. दुपारी अकरा वाजेपासून शेकडो विद्यार्थी इथे त्यांच्या पालकांसोबत आले होते. पंचायत समितीच्या आवारातच ठिय्या आंदोलन करून विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला.

तेजापूर येथील जिल्हा परिषदेचा शाळेत एक ते सात पर्यंत तुकड्या आहेत. मात्र या सात वर्गासाठी केवळ एकच शिक्षक आहे. गावक-यांची शाळेवर स्थाई शिक्षकांची मागणी आहे. मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. अखेर संतप्त झालेल्या विद्यार्थी, पालक व गावकऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारातच शाळा भरवून शासनाच्या कार्याला विरोध दर्शविला आहे.

गेल्या वर्षी या शाळेत एकूण सात शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवायचे. या वर्षी सहा शिक्षकांच्या बदल्या झाल्याने शाळेवर एकच शिक्षक उरले होते. त्यामुळे 137 विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी एकाच शिक्षकावर आली. तर एक शिक्षकी शाळा असल्याने इथे दोन शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली.

ज्या शाळेत शिक्षकांची संख्या पुरेशी असते किंवा जिथे अतिरिक्त शिक्षक असतात अशा शिक्षकांची दुसऱ्या शाळेवर प्रतिनियुक्ती केली जाते. मात्र प्रतिनियुक्ती ही तात्पुरती सोय आहे. ते शिक्षक कधीही शाळेतून दुसऱ्या जागी जाऊ शकतात. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. याआधीही तेजापूर वासियांनी ताला ठोको आंदोलन करून वारंवार निवेदन दिले आहे. मात्र त्यांच्या मागणीवर कोणताही निर्णय झाला नाही.

गटविकास अधिकारी, सभापती नसल्याने संबंधित सदस्य कोणताही निर्णय घेऊ शकते नाही. यात मध्यस्ती करीत शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष विश्वास नांदेकर आले होते. त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत गावकऱ्यांनी पंचायत समितीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

या शाळेत अगोदर 232 विद्यार्थी शिक्षण घेत होते. परंतु आता ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. एकीकडे सरकार सर्व शिक्षा अभियान चालविते, सरकारी शाळा डिजिटल करण्याची भाषा बोलल्या होते. व गावातील विद्यार्थ्यांचा साधा शिक्षकांचा प्राशन सोडबीत नाही. ही फार मोठी शोकांतिका असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.