तेलंगानात कत्तलीसाठी गायी घेऊन जाणारी चारचाकी जप्त
तीन आरोपींसह 4 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त
सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलिसांनी तेलंगानात कत्तलीसाठी गायी जाणाऱे वाहन पकडले. गुरूवारी रात्री मुकुटबन जवळ ही कारवाई करण्यात आली. यात तीन गोतस्करांना अटक करण्यात आली.
मुकुटबन पोलीस स्टेशन हदीतून तेलंगानात काही गोवंश तस्कर बैला ऐवजी गायी घेऊन जात असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे ठाणेदार गुलाब वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितिन चुलपार सह जमादार अशोक नैताम, प्रवीण ताेडकोकुलवार, स्वप्निल बेलखेड़े यांनी रात्री 10.30 वाजता सापला रचला. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास मुकुटबन तलाव जवळील हीरो होंडा शोरूम जवळ पांंढऱ्या कलरची बोलेरो पिकअप (एम एच् २९ टी ३०७२) आले. पोलिसांनी वाहन थांबवून वाहनाची पाहणी केली असता त्यात गायी निर्दयीपणे कोंबलेल्या दिसल्या.
पोलिसांनी वाहनातील 9 गायी ज्याची किंमत 68 हजार रुपये व चारचाकी बोलेरो पिकअप वाहन ज्याची किंमत 4 लाख रुपये असा एकूण 4 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सय्यद खय्याम सय्यद गफार (28) गाडीचालक संतोष कल्लुरवार (32) यांना अटक केली. गायी नेत असलेल्या दोघांची कसुंन चौकशी केली असता त्यांनी या गायी कायर येथील शेख साजिद शेख साबिर यांच्या असल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी तिघांवरही कलम 5 प्राणी संरक्षण क़ायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरु आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी तेलंगानात म्हैस व बैलांची तस्करी सुरू होती. परंतु या जनावर तस्करांनी आपला मोर्चा आता गायीच्या तस्करीकडे वळवला आहे. तामुळे प्रचंड वाढ केली आहे. जनावर तस्करी बाबत ठाणेदार गुलाब वाघ यांच्याशी बातचीत केली असता हद्दीतून जाणाऱ्या जनावर तस्करांवर कठोर कार्यवाही केली जाईल असे सांगितले.